मी नवीन च आयुर्वेदिक ओपीडी शिरुर या माझ्या तालुक्याच्या ठिकाणी सुरु केली होती. शनिवारी व रविवारी मी ही ओपीडी पाहत असे. साधारण २-३ ऱ्या महिन्यात च एक आजी आपल्या नातवाला घेवून माझ्याकडे आल्या. भलीमोठी रिपोर्ट्स ची फाइल माझ्या कडे देत ..हे लेकरु तुमच्या ओट्यात घातलय काय कराच ते करा पण त्याला तेव्हडं बर करा. [...]
काही दिवसांपूर्वी जया आणि राज (ओळख लपविण्यासाठी नावे बदललेली आहेत) कुणाच्यातरी ओळखीने माझ्या रुग्णालयात आले. दोघांच्याही चेहऱ्यावर असंख्य प्रश्नांची भेंडुळी आणि चिंता स्पष्ट दिसत होती.माझ्या १८ वर्षाच्या चिकित्सा अनुभवातुन ही वंध्यत्वाची केस असणार हे एव्हाना माझ्या लक्षात आले होते. पण माझ्या नेहमीच्या सवयीने बोला काय होतय आपल्याला म्हटल्यावर त्यानी सोबत च्या बँगेतून भला मोठा फाईल्सचा गठ्ठा माझ्या पुढे ठेवला. [...]
सोरायसिस हा आजार प्रतिकारशक्तीच्या बिघाडामुळे उद्भवतो. यामध्ये त्वचेचा वरचा स्तर जाण्याआधीच आतुन नवीन स्तर येतो. त्वचा जाडसर दिसते. त्वचेवर खाज येते. खाजवल्यास कोंडा पडतो. त्वचा ओबडधोबड व विचित्र दिसते. त्यामुळे हा रुग्ण सार्वजनिक जीवनाला मुकतो. जवळचे लोक सुद्धा दूर होतात.रुग्णाची मानसिक अवस्था बिघडते. योग्य वेळी जर आयुर्वेदाची मदत या रुग्णांनी घेतली तर त्यांना नक्कीच फायदा होतो. [...]
आज आधुनिक युगात झाडाझुडडपांची जागा सिमेंटच्या जंगलाने घेतलली. रिकामी मैदाने केव्हाच हद्दपार झाली. मुलांना खेळायला मैदानच उरले नाही. परिणामी मुलांचे मैदानी खेळ कमी होवून मुले टी.व्ही. मोबाईल यांच्या आहारी जावू लागली आहेत.. [...]