सोरायसिस हा आजार प्रतिकारशक्तीच्या बिघाडामुळे उद्भवतो. यामध्ये त्वचेचा वरचा स्तर जाण्याआधीच आतुन नवीन स्तर येतो. त्वचा जाडसर दिसते. त्वचेवर खाज येते. खाजवल्यास कोंडा पडतो. त्वचा ओबडधोबड व विचित्र दिसते. त्यामुळे हा रुग्ण सार्वजनिक जीवनाला मुकतो. जवळचे लोक सुद्धा दूर होतात.रुग्णाची मानसिक अवस्था बिघडते. योग्य वेळी जर आयुर्वेदाची मदत या रुग्णांनी घेतली तर त्यांना नक्कीच फायदा होतो. हा आजार योग्य उपचार व पथ्यकर आहार विहाराने पूर्ण बरा होवू शकतो.
आयुर्वेदात कुष्ठ या प्रकारात अनेक त्वकरोगांचे वर्णन केले आहे.खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीने, चुकीच्या दिनचर्येमुळे हा आजार होतो असे आयुर्वेद मानते.हा आजार संसर्गजन्य नाही. हा आजार अनुवांशिक असु शकतो. हिवाळ्यात व पावसाळ्यात हा आजार बळावू शकतो. अतिचिंता हा आजार वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.
आयुर्वेदानुसार याची कारणे:
-वात व कफ दोष वाढवणारा आहार विहार
-विरुध्द आहार (दुध व फळे एकत्र करून खाणे, मासे व दुध, गरम व थंड इ.)
-अनियमित जेवण घेणे.
-शिळे पदार्थ खाणे.
इ.
हा आजार कसा होतो ?
आयुर्वेदाने त्वचेचे ७ स्तर (layer) वर्णन केले आहेत. त्यातील चवथ्या किंवा पाचव्या स्तरा मध्ये वात व कफ दोष दुष्टीमुळे हा आजार निर्माण होतो.बिघडलेल्या वातामुळे त्वचेतल्या बाहेरील स्तरातील पेशी निघून जाण्या आधीच आतुन नवीन पेशी तयार होतात.त्यामुळे त्वचा जाडसर होते. तेथे खाज येवून पापुद्रे निघायला लागतात.त्वचा ओबडधोबड व विचित्र दिसते. चकते दिसु लागतात. हे चकते प्रामुख्याने सांधे व पोट पाठ मांड्या इ. ठिकाणी जास्त प्रमाणात दिसतात. यामध्ये सांध्यांच्या ठिकाणी कधी कधी सुज व वेदना पण दिसून येतात.
खाण्याचे कोणते प्रकार टाळवेत?: -
जास्त खारट(पापड, लोणचे, चिवडा, वेफर्स इ.)
आंबट (चिंच, दही, कैरी, आंबवलेले पदार्थ इ.)
बेकरीचे पदार्थ (खारी, बिस्कीट, बटर इ.)
विरूध्द आहार(दुध+फळे, दुध+मासे इ.)
विरुद्ध विहार (उन्हातून एकदम एसीत जाणे किंवा एसीतुन एकदम उन्हात जाणे, रात्री जागरण व दिवसा झोप, जेवणानंतर लगेचच व्यायाम करणे)
हे सर्व टाळले पाहिजे.
औषधोपचार :-
योग्यवेळी आपल्या नजीकच्या वैद्याला (आयुर्वेद तज्ञाला ) भेटून त्यांच्या सल्ल्याने योग्य शोधन व शमन उपचार करून घ्यावे. योग्य वेळी योग्य उपचार झाल्यास सोरायसिस नक्की बरा होतो.
जीवनधारा आयुर्वेद रुग्णालयात यावर यशस्वी चिकित्सा केली जाते. आजपर्यंत अनेक रुग्णांवर आमच्या रुग्णालयात यशस्वी चिकीत्सा करून त्यांना सुखी करण्याचे काम आम्ही केले आहे.
लेखक :
डॉ. यशवंत ब घोडे
जीवनधारा आयुर्वेद रुग्णालय
१०८ राम आळी , शिरुर.
पुणे ४१२२१०
मो. 9850181132
Gmail:- [email protected]
www.jeevandhara.co